वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेतील १९ वर्षाखालील मुले गटात बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय अंतिम विजेता ठरला. उपांत्य व अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळ करत अंतिम सामना जिंकण्यात यशस्वी ठरला व विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.
या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सचिव जयकुमार देसाई, पेट्रन कॉन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन मंजिरी देसाई मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम बी चौगुले, पर्यवेक्षक डी.जी. शितोळे, जिल्हा क्रीडाधिकारी सचिन रणदिवे, सुरेंद्र चव्हाण, जिमखाना चेअरमन व्हि. पी. देसाई, जे. वाय. नाईक यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक वासुदेव गावडे, हेमंत गावडे, राष्ट्रीय खेळाडू सॅमसन फर्नांडीस यांचे मार्गदर्शन लाभले.