वेंगुर्ले : सिंधुदुर्ग सुवर्णकार समाजातील युवक संघटीतपणे एकत्र येण्यासाठी वेंगुर्ले कँम्प येथील क्रीडांगणावर दि. ४ मार्च रोजी दैवज्ञ चषक २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यास रोख रुपये ११ हजार रुपये व उपविजेत्यास रोख रुपये ७ हजार आणि चषक तसेच मालिकावीर, सामनावीर, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून दैवज्ञ समाजातील युवकांना संघटीत करण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेत दैवज्ञ समाजातील युवकांनी आपल्या संघासह भाग घ्यावा. तसेच स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी दैवज्ञ समाज बांधवाबरोबरच क्रिकेट रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्लेचे अध्यक्ष दीपक मालवणकर आणि आयोजक भाऊ मालवणकर यांनी केले आहे.