सावंतवाडी : संचालक व्यवसाय शिक्षण संचालनालय मुंबई यांच्या तंत्र प्रदर्शन व क्रीडा स्पर्धा यांच्या आयोजना अंतर्गत पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या क्रिडामैदानावर संपन्न झाल्या.
या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 शासकीय आय टी आय व 1 खासगी आय टी आय असे एकूण 9 औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी सहभाग दर्शविला, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, हॉलीबॉल हे सांघिक खेळ तर रांगोळी, कॅरम, 100 मीटर धावणे 100 ते 400 मीटर रिले या वैयक्तिक खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेतील 100 मिटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक कु रोहन गावकर (वायरमन) खाजगी आय टी आय माडखोल या विद्यार्थ्यांला प्राप्त झाला तसेच क्रिकेट चा अंतिम सामना औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी आणि शनैश्वर खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था माडखोल यांच्यात रंगला. अतिशय अटितटीच्या झालेल्या चुरशीत अखेर शनैश्वर खासगी औद्योगिक प्रशिक्षण माडखोल संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विजय संपादन केला यापुढील व्यवसाय शिक्षण संचालनालय मुंबई मध्ये विभागाच्या होणाऱ्या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व शनैश्वर खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था माडखोल करणार आहे.
या क्रिकेट संघात इलेक्ट्रिशन आणि वायरमन ट्रेड मधील विद्यार्थी सहभागी होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ राहुल वेदप्रकाश पाटिल यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील महाविद्यालयीन प्राचार्य, निदेशक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.