कोलगाव येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा !

श्री ईस्वटी कला-क्रीडा मंडळ, कोलगाव - भोमवाडी आणि मुक्ताई ॲकॅडेमी, सावंतवाडी यांचे संयुक्त आयोजन
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 04, 2023 14:16 PM
views 286  views

सावंतवाडी : श्री ईस्वटी कला-क्रीडा मंडळ, कोलगाव - भोमवाडी आणि मुक्ताई ॲकॅडेमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी कोलगाव तिठ्याजवळील वेंगुर्ले - बेळगाव रोडवरील कोलगाव माध्यमिक विद्यालय येथे घेण्यात येईल. दहा व पंधरा वर्षे वयोगटातील मुला - मुलींचे चार गट आणि खुला गट अशा एकूण पाच गटात स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन कोलगाव ग्रामपंचायत सरपंच संतोष राऊळ यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता करण्यात येईल. राष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा खेळविण्यात येईल. स्पर्धा बाद फेरीत न खेळविता लीग पदधतीने घेण्यात येईल. एका स्पर्धकाला वेगवेगळ्या स्पर्धकांसोबत खेळावयास मिळेल. स्पर्धकांच्या संख्येवर फे-या ठरविण्यात येतील. आयोजकांचा निर्णय सर्वांसाठी अंतिम आणि बंधनकारक राहील. स्पर्धकाने स्पर्धेसाठी येताना सोबत आधारकार्ड आणणे आवश्यक आहे.

खुल्या गटात पाच आणि दहा व पंधरा वर्षे वयोगटातील मुला - मुलींच्या चार गटात तीन - तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे प्रथमच दिव्यांग स्पर्धकासाठी पारितोषिक ठेवण्यात आले आहे.स्पर्धकांनी आपली नावे कौस्तुभ पेडणेकर (मोबाईल क्रमांक ८००७३८२७८३) यांच्याकडे शुक्रवार दि. १० फेब्रुवारीपर्यंत नोंदवायची आहेत.