जिल्हास्तरीय ॲथलेटिक्समध्ये RPDच्या आस्था लिंगवतचं यश

Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2025 14:08 PM
views 77  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कुल व ज्यु. कॉलेज, सावंतवाडी या प्रशालेची इ.०६ वी ची विद्यार्थिनी आस्था अमित लिंगवत हिने 60 मीटर तसेच 300 मीटर रेनिंग या क्रीडाप्रकारात उत्तम कामगिरी केली आहे.

 तिची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड  झाली आहे. दि.23 व 24 फेब्रुवारी 2025 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय , पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत कु. आस्था अमित लिंगवत हि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशस्वितेसाठी व RPD प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल कु.आस्था हिचे तसेच मार्गदर्शक शिक्षक - पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव  व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य, सर्व संस्था सदस्य  मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक एस . एन पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक तसेच पालक ,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी , पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरासाठी शुभेच्छा दिल्या.