जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत गुढीपर पिंगुळी अजिंक्य

कुमारी गटात एसएम सिंधू स्पोर्ट्स अजिंक्य
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 19, 2025 15:22 PM
views 15  views

कुडाळ : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने घेण्यात येणारी कुमार /कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा देवगड जामसंडे येथे देवगड तालुका कबड्डी असोसिएशन व माजी आमदार ॲड. अजितराव गोगटे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. सदर स्पर्धेत  कुमार गट २३ संघ तर कुमारी गट ८ संघ जिल्ह्यातून  सहभागी झाले होते. स्पर्धेतील सर्व सामने चुरशीचे व अटीतटीचे झाले. कुमार गटात  गुढीपूर पिंगळी संघाने रियांश स्पोर्ट्स तेंडोली संघावर मात करत अंतिम विजेतेपद पटकावले तर  कुमारी गटात एसएम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ संघाने जय गणेश मालवण संघाचा पराभव करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. 

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी देवगड तालुका कबड्डी असोसिएशनचे तसेच देवगड तालुका बीजेपी पदाधिकारी,  कार्यकर्ते तसेच अध्यक्ष सुभाष धुरी यांचे विशेष योगदान लाभले. याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ॲड. अजितराव गोगटे म्हणाले की, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या माध्यमातून  कबड्डीचे जे रोपटे देवगड मध्ये लावले होते त्याचे वटवृक्षात रूपांतर होताना दिसत आहे. अनेक कबड्डी खेळाडूंनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर देवगड तालुक्याचे नाव उंचावले आहे. तर आपले जिल्हा संघ राज्यस्तरावर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तरुण-तरुणीनी या कबड्डी खेळाकडे वळावे, जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरिता दरवर्षी लाखो रुपये खर्च करून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन आम्ही करत असतो. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात कबड्डीला चांगले दिवस येत आहेत. परंतु खेळाडूंनी एकसंघ भावनेने कबड्डी खेळाकडे आपले करिअर म्हणून पाहणे आवश्यक आहे. शिक्षण आणि खेळ याची सांगड घालून आपला बौद्धिक आणि शारीरिक विकास त्यांनी केला पाहिजे. आमच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने पुन्हा एकदा खेळाडू व फेडरेशन यांमधील गैरसमज दूर होऊन  समन्वय साधला गेला आहे याचा मला विशेष आनंद आहे. कबड्डी खेळाडू व कार्यकर्ते यांनी आता मागे न पाहता जिल्ह्यातील कबड्डीला पुढे नेऊया असे आवाहन त्यांनी केले. 

स्पर्धेवर  निवड समिती प्रमुख मार्टिन आल्मेडा, निवड समिती सदस्य म्हणून सुभाष धुरी, सुदीन पेडणेकर, राजू बंगे, शैलेश नाईक, गुरु पवार, सौ. प्रियांका कोरगावकर  यांनी काम पाहिले. तर छाननी समिती सदस्य म्हणून दीपक चव्हाण, शुभम धुरी, जयेश परब, प्रणील धोपटे, चेतन राणे, संदेश पाटकर, यांनी काम पाहिले. स्पर्धा निरीक्षक तुषार साळगावकर, छाननी समिती व पंचप्रमुख प्रशांत वारीक सहाय्यक पंचप्रमुख राजेश सिंगनाथ तर पंच म्हणून किशोर पाताडे मिलिंद निकम, जयेश परब, गिरीश चव्हाण, वैभव कोंडस्कर, पंकज राणे, सोन्या धुरी आदिनी काम पाहिले. स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्ष रुजारीओ पिंटो व सहसचिव नितीन हडकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करणाऱ्या आयोजकांचे, निवड समिती, छाननी समिती सदस्यांचे व पंचांचे तसेच विजय व विजयी तसेच सहभागी सर्व संघांचे  कार्यवाह दिनेश चव्हाण यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

सदर स्पर्धेतून  कुमार व कुमारी प्रत्येकी १४ खेळाडूंचा संघ निवडला असून निवडलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर देवगड येथे गुरुवार  दिनांक २० नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. निवडलेले दोन्ही संघ पुणे येथे दिनांक २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या कुमार/कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निवडलेला कुमार / कुमारी संघ खालील प्रमाणे

कुमार गट -१) कु.बाळू तांबे  २) कु साहिल तावडे ३) कु  मनजीत मुळीक ४) कु  तनुज चव्हाण ५) कु   प्रज्ञेश कोचरेकर ६) कु यश पाटील ७) कु  सोहम कुंभार ८) कु विराज बागवे ९) कु  रोहन कांबळे १०) कु अथर्व गावडे  ११) कु सोहेल शेख १२) कु  निखिल चव्हाण १३) कु  निशांत घाडी १४) कु .रोहित सावंत

कुमारी गट -१) कु मिताली गावडे २) कु पलक गावडे ३) कु ऋतिका चव्हाण  ४) कु रिया शिरोडकर ५) कु रिया पालकर ६) कु  निकिता फर्नांडिस ७) कु  श्रावणी गुळेकर ८) कु भक्ती कुटे  ९) कु  भक्ती इंगळे १०) कु  रिद्धी काडगे ११) कु कुंजल गावकर १२) कु  उषा पवार १३) कु  सानिका नाईक १४) कु तन्वी  कुळये .