आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथी खेळाडूचे होणार पदार्पण

Edited by: ब्युरो
Published on: September 01, 2023 12:56 PM
views 203  views

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस नवीन असतो. मात्र, असे खूप कमी वेळा होते, जेव्हा अचानक काहीतरी नवीन घडते. लवकरच टी20 विश्वचषक 2024 क्वालिफायर सामन्यांना सुरुवात होणार आहे. या सामन्यांदरम्यान असेच काहीतरी घडणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच तृतीयपंथी खेळाडू मैदानावर खेळण्यासाठी उतरताना दिसणार आहे. बांगलादेश विरुद्ध कॅनडा संघात होणाऱ्या सामन्यादरम्यान हा ऐतिहासिक क्षण घडणार आहे.

टी20 विश्वचषक 2024 क्वालिफायर सामन्यांसाठी कॅनडाची डॅनियल मॅकगेई ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली तृतीयपंथी खेळाडू बनणार आहे. डॅनियल बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कॅनडाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. डॅनियलला पुढील महिन्यात होणाऱ्या सामन्यांसाठी कॅनडा संघात निवडले गेले आहे.

कॅनडाच्या 29 वर्षीय डॅनियलने पुरुषापासून महिला तृतीयपंथी खेळाडूंसाठी आयसीसी पात्रतेचे सर्व निकष पूर्ण केले आहेत. यामुळे तिला कॅनडाच्या संघात सामील करण्यात आले आहे. अशात ती, कॅनडाकडून खेळून तृतीयपंथी क्रिकेटपटू बनण्याचा विक्रम आपल्या नावावर करेल.

‘देशाचे प्रतिनिधित्व करणे सन्मानाची बाब’- कॅनडाच्या क्रिकेट संघात निवडल्यानंतर डॅनियल म्हणाली, देशासाठी खेळणे तिच्यासाठी सन्मानाची बाब असेल. तसेच, तृतीयपंथी समुदायाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी खूपच सन्मानाची बाब आहे. तिने सांगितले, की ती 2020मध्ये ऑस्ट्रेलियाहून कॅनडाला आली होती, ज्यानंतर ती नोव्हेंबरमध्ये पुरुषापासून महिला बनली होती. तिने 2021पासूनच वैद्यकीय बदल सुरू केले होते. आयसीसीनेही पुष्टी केली की, डॅनियलने आयसीसीच्या पात्रतेसंबंधी सर्व अटी पूर्ण केल्या आहेत आणि तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

माध्यमांशी बोलताना डॅनियल, “ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी माझ्या समुदायाचे प्रतिनिधित्व करणे माझे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे.” याव्यतिरिक्त आयसीसीने याबाबत म्हटले की, “आम्ही याची पुष्टी करतो की, डॅनियलने आयसीसीच्या पात्रतेसंबंधी सर्व अटी पूर्ण केल्या आहेत आणि ती आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी पात्र आहे.”

क्वालिफायर स्पर्धा लॉस एंजेलिसमध्ये 4 ते 11 सप्टेंबरदरम्यान खेळल्या जाणार आहेत. टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत जागा मिळवण्यासाठी अमेरिकन क्वालिफायरमध्ये कॅनडाचा सामना अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिकासोबत होणार आहे.