कणकवली : कणकवलीमध्ये अभय राणे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ARM प्रो कबड्डीचा थरार थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते थोड्याच वेळात होणार आहे.
पुरुष गटामध्ये नामांकित ८ संघ सहभागी झाले आहेत तर महिला गटांमध्ये नामांकित ९ संघाचा या प्रो कबड्डी मध्ये सहभाग आहे. भव्य अशी होणारी प्रो कबड्डी पाहण्यासाठी कबड्डी प्रेमी आतुर झाले आहेत.