रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाच्या मुलांचे कबड्डी स्पर्धेत यश

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 18, 2025 17:23 PM
views 8  views

मालवण : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे वराडकर हायस्कूल, कट्टा येथे आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या मालवण तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा प्रकारात मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा संघ काळसे संघाला नमवून विजयी झाला. हा जिल्हास्तरावर मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच याच कनिष्ठ महाविद्यालयाचा १९ वर्षाखालील मुलींचा संघ उपविजेता ठरला.

मुलांच्या संघात राज लाड, आर्यन सुर्वे, शुभम लुडबे, मयुर बागवे, सार्थक आचरेकर, विघ्नेश्वर वडवलकर, आयुष म्हापणकर, निशांत शिरोडकर, रोहन कांदळगांवकर, तानाजी मानवर, सुरज आळवे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय केनवडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.