सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या कॅडेट ओम मंगेश निकम याने चौदा वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला. कॅडेट कणाद मिलिंद कुलकर्णी याने 19 व्या वर्षाखालील वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला. दोन्ही खेळाडू विजेतेपद पटकावून जिल्हा स्तरासाठी पात्र ठरले आहेत.
माध्यमिक विद्यालय मळगांव येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बुद्धिबळ स्पर्धेतील विजेते खेळाडू व क्रिडाशिक्षक सतीश आईर व मनोज देसाई यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डांटस, सर्व संचालक, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य एन. डी. गावडे यांनी करून पुढील जिल्हास्तराकरिता शुभेच्छा दिल्या.