
सावर्डे : क्रीडा व युवक संचनालय पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2025- 26 च्या चिपळूण तालुकास्तरीय बुद्धिबळ शालेय स्पर्धेचे आयोजन युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटात तालुक्यातील 25 शाळांमधील 92 खेळाडू सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडू नीरज इनामदार याने सहा पैकी पाच डाव जिंकून चिपळूण तालुक्यात प्राविण्य मिळविले व रत्नागिरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नीरज इनामदारची निवड झाली आहे.
या स्पर्धेमध्ये विद्यालयातील प्रणव नायक, जनक पाटणकर, चैतन्य शेंबेकर, अंश पाणींद्रे, आयुष पवार, वेदांत शिर्के सोहम गोसावी, साई जाधव, गंधर्व धने हे दहा खेळाडू सहभागी झाले होते. सर्व खेळाडूंनी स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली. सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक रोहित गमरे, अमृत कडगावे योगेश नाचणकर, प्रशांत सकपाळ दादासाहेब पांढरे यांचे मार्गदर्शन लागले.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक व आमदार शेखरजी निकम,ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर,संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, सचिव महेश महाडिक,शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण,विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.