सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिल्ह्यातील मुलांसाठी व मुलींसाठी मोफत कॅरम प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उदघाटन प्रमुख पाहुण्या कल्पवृक्ष डान्स ॲकेडमीच्या अध्यक्षा नृत्य शिक्षिका उर्मिला पेडणेकर यांच्या हस्ते आणि अनुपमा शेटगे, राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिबीरात कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी येथून आलेल्या जिल्ह्यातील 60 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सतत दोन वर्षे शालेय कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली ॲकेडमीची विद्यार्थीनी साक्षी रामदुरकर हीचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उर्मिला पेडणेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, कॅरम खेळ सर्वांनाच आवडतो. विद्यार्थ्यांनी कॅरम नियमित खेळल्यास एकाग्रता वाढेल. शालेय स्पर्धेत जिल्हास्तर ते राष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्यास त्याचे गुण मिळतील. तसेच कौस्तुभ पेडणेकर पुढील महिन्यापासून होणा-या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणा-या गुणांबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी कौस्तुभ पेडणेकर यांनी ॲकेडमीत कथ्थक, लोकनृत्य, बाॅलिवुड,इत्यादी नृत्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. स्नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.