साक्षी रामदुरकरची सलग तीन वर्षे राज्य स्तरावर झेप !

Edited by: विनायक गांवस
Published on: November 21, 2024 18:34 PM
views 79  views

सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर हीने शालेय कॅरम स्पर्धेत राज्य स्तरावर पाचवा क्रमांक मिळवला आहे. साक्षीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेत मुलींच्या चौदा वर्षे वयोगटात तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक, विभाग स्तरावर तृतीय क्रमांक आणि राज्य स्तरावर पाचवा क्रमांक मिळवला आहे. 


सतत तीन वर्षे राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर निवड होणारी ती जिल्ह्यातील एकमेव खेळाडु ठरली आहे.तीने शालेय आणि असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये जिल्हा आणि राज्य स्तरावर निर्विवाद यश मिळवले आहे. साक्षीसोबत मुलींच्या चौदा वर्षे वयोगटात ॲकेडमीची आस्था लोंढे या विदयार्थिनीची राज्य स्तरावर आणि मुलांच्या गटात स्मित सावंत याची विभाग स्तरावर निवड झाली.मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विदयार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.सर्व स्तरावर या विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.साक्षी रामदुरकर हीला राष्ट्रीय स्तरावर होणा-या कॅरम स्पर्धेसाठी सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.