सावंतवाडी : तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांनी उत्तम यश संपादन करत जिल्हास्तरासाठी आपले स्थान पक्के केले. मुलांच्या संघामधून दहावीतील स्वरूप नारायण नाईक, मुलींच्या संघामधून आठवीतील स्वरा धुरी तसेच सातवीतील नमिष्का माणगावकर आणि अनुष्का गावडे या चौघांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली.
चारही विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर तसेच एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या.