राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत ऋन्मय शिरवलकरला कांस्यपदक !

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 01, 2024 06:21 AM
views 248  views

कणकवली : तायक्वान्डो अससोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने रत्नागिरी स्पोर्ट्स अससोसिएशनच्यावतीने रत्नागिरी येथील रॉयल बँकवेट हॉल येथे 29 एप्रिलला राज्यस्तरीय खुली तायक्वांडो स्पर्धा घेण्यात आली. यात कणकवलीच्या ऋन्मय राजेश शिरवलकर याने कांस्य पदक पटकवले आहे.

या स्पर्धेत राज्यभरातून खेळाडू सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व करत ऋन्मय 25 किलो वजनी गटात सहभागी होऊन कांस्यपदक मिळवले. ऋन्मयला तायक्वांडो राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक एकनाथ धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.