वेंगुर्ले : कलीना कॅम्पस मुंबई येथे घेण्यात आलेल्या मुंबई क्रिकेट स्पर्धेत मुंबई विद्यापीठ कोकण झोनच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यामधील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या पिटर व्हिक्टर फर्नांडिस, शंकर प्रदिप मांजरेकर, लिंगराज यल्लाप्पा चौगुले या तीन खेळाडूंनी मुंबई विद्यापीठाचे ब्राँझ पदक प्राप्त केले आहे. या स्पर्धेमधून कु. पिटर व्हिक्टर फर्नांडिस याची दि. ९ जानेवारी ते १५ जानेवारी रोजी कोटा राजस्थान येथे होणाऱ्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेकरीता निवड झाली आहे.
या खेळाडूंना संस्थेचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे - देसाई, पेट्रन कॉन्सिल मेंबर मा. दौलतराव देसाई, प्राचार्य एम. बी. चौगले, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, क्रिडा संचालक प्रा. जे. वाय. नाईक, जिमखाना चेअरमन डॉ. कमलेश कांबळे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.