
चट्टोग्राम : भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चट्टोग्राम येथे खेळल्या जात आहे. या सामन्यात इशान किशनने वनडे कारकिर्दीतील ठोकले पहिले द्विशतक. त्याने १३१ चेंडूंत २४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने २१० धावा ठोकल्या आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताची धावसंख्या ३०६ झाली आहे. तर विराट कोहलीही शतकाच्या जवळ पोहोचला आहे. या सामन्यात तो आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७२ वे शतक पूर्ण करू शकतो.