देवगड : देवगड तालुक्यातील पप्पू कदम याची शरीरसौष्ठ स्पर्धेत भुवनेश्वर ओडीसा येथे निवड झाली आहे. पेशाने चालक असलेला भुनेश्वर याची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. पण, तो सध्या शरीरसौष्ठ क्षेत्रात उतरला आहे. त्याने शरीरसौष्ठ स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे. त्याची बॉडीबिल्डिंगच्या निवडचाचणीत नॅशनल बॉडीबिल्डिंग 2024 भुवनेश्वर,ओडिसा येथे निवड झाली आहे.
त्याची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्याची बॉडीबिल्डिंग स्पर्धेतील आवड पाहता व त्याची धडपड पाहता बाळू माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या MH 07 चालक मालक ग्रुपकडून जमलेली रु ११ हजारची आर्थिक मदत शासकीय विश्राम गृह कणकवली येथे पप्पू कदम यांना सुपूर्द केली. त्याला या ग्रुपने आर्थिक मदत केली आहे. यावेळी या ग्रुपचे सदस्य बाळू माने,निलेश मयेकर, अरुण जोगळे, नितिन कुवळेकर, विशाल राणे, बाबू सकपाळ, राजेश दळवी, अक्षय वारंग, भूषण गोसावी,अर्जुन शिंगनाथ, संजय गुरव आदी उपस्थित होते.