बोडदे शाळेचे प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

Edited by: लवू परब
Published on: December 13, 2025 12:42 PM
views 74  views

दोडामार्ग : शैक्षणिक वर्ष 2025 / 26 च्या प्रभा गस्तरीय क्रीडा स्पर्धेत जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा बोडदे शाळेने घवघवीत यश संपदीत केले आहे. मोठा गट ज्ञानी मी होणार प्रथम क्रमांक - कु. सान्वी गुरुदास सावंत व श्रावणी गणपत गवस, मोठा गट १०० मीटर धावणे व्दितीय क्रमांक -  गौतम सोरेन, गोळा फेक  व्दितीय क्रमांक -  सर्वांग रामचंद्र गवस, उंच उडी व्दितीय क्रमांक - सान्वी गुरुदास सावंत, लांब उडी - गौतम सोरेन व्दितीय, कबड्डी मुली - व्दितीय क्रमांक पटकावीला आहे.

बोडदे शाळेच्या मुलांनी मिळविलेल्या या यशाबद्दल पंचक्रोशी मध्ये शाळा बोडदे व मुलांचे कौतुक करण्यात येत आहे. साक्षी संदिप नाईक अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक वर्गाने, हरिश्चंद्र नाईक सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य बोडदे , साटेली प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत नाईक यांनी मुलांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक गोपाळ पाटील, मंजुश्री परब व महेश नाईक यांचे कौतुक करून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.