सावंतवाडी : वेंगुर्ला येथे नाईक जिम अँड फिटनेस वेंगुर्ला व कोकण सिंधू पावर लिफ्टिंग सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सावंतवाडीतील बिस्ट जोकर फिटनेस व्यायाम शाळेचे विद्यार्थी सब ज्युनिअर (अठरा वर्षाखालील) गटामध्ये प्रणव कारिवडेकर, रोहित झोरे, पंकज मल्हार, गुंजन बहादुर, सायली सावंत व ज्युनिअर गटामध्ये (एकविस वर्षाखालील) निलेश सावंत, साहिल यादव, तन्मय चव्हाण, अंकुश सिंग, लोकेश गावडे, बाबली करमळकर, आकाश टक्कर, सायली सावंत, गुंजन बहादूर, सीनियर गटामध्ये (एकविस वर्षावरील) योगेश रावल, मनीष कुणकेरकर, राहुल माठेकर यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत ठराविक वजन गटातून चार गोल्ड मेडल, दोन सिल्व्हर मेडल तीन ब्रोंझ मेडल तसेच सात विद्यार्थी उत्तेजनार्थ ठरलेले आहेत. यामध्ये सब ज्युनिअर महिला गटामध्ये स्ट्रॉंग वुमन म्हणून सायली सावंत हिला चषक प्राप्त झाले आहे.या सर्वांच्या यशाबद्दल व्यायामशाळेकडून व प्रशिक्षक सौरभ वारंग व सहकाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.