सांगली : यावर्षी सांगलीमध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. तिला चांदीची मानाची गदा सुपूर्द करण्यात आली.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कल्याणची वैष्णवी पाटील उपविजेती ठरली आहे. सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं.
प्रतीक्षाने वैष्णवीला चितपट करीत डाव जिंकला. प्रतीक्षाला पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळाला आहे. प्रतीक्षाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात या पहिल्यावहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघातर्फे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत पार पडल्या. या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास ४०० हून अधिक महिला कुस्तीगिर दाखल झाल्या होत्या.