वेंगुर्ला:
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने " "वेंगुर्ला भंडारी चषक २०२३" टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ८ व ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. वेंगुर्ला येथील कॅम्प स्टेडियम मध्ये खेळवल्या जाणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रुपये ११ हजार व आकर्षण भंडारी चषक तर उपविजेत्या संघास रोख रुपये ७ हजार व आकर्षक भंडारी चषक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील मालिकविर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, प्रत्येक सामन्यातील सामनावीर यांना सुद्धा वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत खेळणारा प्रत्येक खेळाडू हा वेंगुर्ला तालुक्यातील भंडारी ज्ञातीतील असणार आहे. तरी सर्व क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लाचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाने केले आहे.