देवगड : किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये बाळू गोपाळ तांबे या विदयार्थ्यांने घवघवीत यश संपादीत करुन प्रशालेचे नाव रोशन केले आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने किशोर गट ( १६ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा नुकत्याच सावंतवाडी येथे पार पडल्या. त्यामध्ये प्रशालेचा कु. बाळू गोपाळ तांबे, इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघात निवड झाली असून, दि. १५ ते १८ डिसेंबर २०२२ रोजी लातूर येथे होणाऱ्या किशोर गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
या त्याच्या यशाबददल कु. बाळू तांबे याचे संस्थाध्यक्ष अजितराव गोगटे, कार्यवाह प्रवीण जोग, क्रीडा समिती अध्यक्ष प्रशांत वारीक, मुख्याध्यापक सौ. मराठे मॅडम, जेष्ठ शिक्षक गोगटे सर यांनी अभिनंदन केले कु. बाळू तांबे यास प्रशिक्षक शुभम धुरी, गुरु पवार, पराग हिरनाईक, मृत्युंजय मुणगेकर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.