नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुकीमध्ये भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे विजय झाले आहेत. या निवडणुकांनंतर सुवर्ण पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याची मोठी घोषणा गुरुवारी (21 डिसेंबर) केली होती. यानंतर आता कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही ट्वीट करत आपला पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा केली आहे.
बजरंग पुनिया यांनी ट्वीट करताना म्हटले की, पंतप्रधान, आशा आहे की तुम्ही निरोगी असाल. तुम्ही देशसेवेत व्यस्त असाल. तुमच्या व्यस्त वेळापत्रकात मला तुमचे लक्ष आमच्या कुस्तीकडे वेधायचे आहे. तुम्हाला माहिती असेलच की, यावर्षी जानेवारी महिन्यात देशातील महिला कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे प्रभारी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. महिला कुस्तीपटूंनी जेव्हा आंदोलन सुरू केले, तेव्हा मी देखील त्यांच्यासोबत उभा होतो.
बृजभूषण यांच्यावर ठोस कारवाई करण्याचे सरकारने आदेश दिल्यानंतर आंदोलक कुस्तीपटू जानेवारीमध्ये त्यांच्या घरी परतले. मात्र सरकारच्या आश्वासनानंतर तीन महिन्यांनी सुद्धा बृजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला नव्हता. म्हणून आम्ही कुस्तीपटू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलो आणि आंदोलन केले. जेणेकरून दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्या विरोधात एफआयआर नोंदवावा, पण कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आम्हाला न्यायालयात जाऊन एफआयआर नोंदवावा लागलाजानेवारीमध्ये बृजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिला कुस्तीपटूंची संख्या 19 होती, पण एप्रिल महिन्यापर्यंत ती 7 वर आली. तीन महिन्यांत आपल्या ताकदीच्या जोरावर बृजभूषण सिंह यांनी न्यायासाठी लढाई करणाऱ्या 12 महिला कुस्तीपटूंना माघार घेण्यास भाग पाडले. आमचे आंदोलन 40 दिवस चालले. पण या 40 दिवसांत आणखी एक महिला कुस्तीपटू माघारी फिरली. कारण आमच्या सर्वांवर खूप दबाव होता, असा दबाव बजरंग पुनिया याने केला आहे.
बजरंग पुनिया याने म्हटले की, आम्ही आंदोलन केलेल्या जागेची तोडफोड करण्यात आली. आम्हाला दिल्लीतून बाहेर काढण्यात आले. आमच्या आंदोलनावर बंदी घालण्यात आली. जेव्हा हे सर्व घडत होते, तेव्हा आम्हाला काही सूचत नव्हते. त्यामुळे आम्ही आमची पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, साक्षी मलिकने गुरुवारी पत्रकार परिषदेत रडत रडत आपली निवृत्ती जाहिर केली. तिने सांगितले की, आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपलो. देशाच्या अनेक भागातून अनेक लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. यात वृद्ध लोकांचा समावेश होता. असेही लोक होते, ज्यांच्याकडे पैसा नव्हता. आम्ही जिंकलो नाही, पण आम्हाला मदत केलेल्य सर्वांचे मी आभार मानते. आम्ही मनापासून लढलो, पण जर बृजभूषण सिंह यांचे सहकारी संजय सिंग भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यामुळे मी माझी कुस्ती सोडते आहे. असे वक्तव्य केल्यानंतर साक्षी मलिकने तिचे शूज उचलून टेबलावर ठेवले आणि आपली निवृत्ती जाहिर केली.