
सावंतवाडी : माजगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, चराठे नं. १ येथील विद्यार्थ्यांनी दिमाखदार कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांसह सांस्कृतिक विभागातही उत्तुंग यश मिळविले आहे. लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांमुळे शाळेने आपला दबदबा सिद्ध केला.
लहान गटात –ओमकार उमेश राऊळ याने ५० मीटर धावण्यात द्वितीय, तर लांबउडीत प्रथम क्रमांक पटकावला. कृष्णा ब्राम्हणेकर (१०० मीटर तृतीय), गंधार परब (लांबउडी द्वितीय), लौकीक मांजरेकर (उंचउडी प्रथम), दिक्षांत चराठकर (उंचउडी तृतीय), स्वरा वेजरे (५० मीटर प्रथम), भार्गवी परब (१०० मीटर द्वितीय) आणि काव्या बिर्जे (उंचउडी तृतीय) यांनी उत्तम कामगिरी केली.
रिले ५०×४ मुलगे व मुली संघांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर कबड्डी मुलगे, समूहगीत आणि समूहनृत्य या तिन्ही स्पर्धांमध्येही शाळेने प्रथम क्रमांक मिळविला.
मोठ्या गटात –सौरभ गावडे (१०० मीटर प्रथम), ईशान चराठकर (१०० मीटर द्वितीय, उंचउडी द्वितीय), सुशांत गावडे (२०० मीटर प्रथम, लांबउडी द्वितीय), जिवीका मेस्री (१०० मीटर प्रथम, उंचउडी द्वितीय), मैथिली बिर्जे (१०० मीटर द्वितीय, उंचउडी प्रथम), प्रचिती केरकर (२०० मीटर द्वितीय), केतकी राऊळ (२०० मीटर तृतीय) आणि धनश्री मेस्री (गोळाफेक तृतीय) यांनी यश मिळविले.
मुली कबड्डी संघ, मुलगे रिले, समूहगीत आणि समूहनृत्य या सर्व स्पर्धांमध्येही शाळेने प्रथम क्रमांकाची नोंद केली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अदिती चव्हाण, धनदा शिंदे, विजय माधव, नागेश बांदेकर, मुख्याध्यापक पेडणेकर, कुंभार मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शन लाभले.














