बॅडमिंटन स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल विद्यार्थ्यांचं यश !

Edited by: विनायक गांवस
Published on: August 17, 2024 13:21 PM
views 150  views

सावंतवाडी : जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विदयार्थ्यांनी उत्तम यश संपादन करत विभागीय फेरीमध्ये स्थान मिळवले. मुलींच्या संघामधून दहावीतील पूर्वा खोबरेकर, रफत शेख आणि सुजाता पंडित यांच्या संघाने १७ वर्षाखालील गटाचे विजेतेपद पटकवून विभागीय फेरीत प्रवेश केला. तसेच मुलांच्या गटातून नववीतील अद्वय देशपांडे यानेही विभागीय फेरीत स्थान मिळवले. विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंतभोसले व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केले व विभागीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.