दोडामार्ग
तळेखोल येथील गवस ब्रदर्स स्पोर्ट क्लबच्यावतीने आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना धुरी यांनी तळेखोल येथे क्रीडांगण साठी येथील युवाईने पुढाकार घ्यावा, आपण खासदार विनायक राउत यांच्या माध्यमातून या ठिकाणी आवश्यक स्टेज व हायमास्ट उभारून देण्याचा अभिवचन तेथील गवस बंधूंना दिले.
1 ते 5 मार्च यादरम्यान तळेखोल ग्राउंड वर 'सातेरी चषक' ही स्पर्धा होतआहे. डबल 51 हजार रुपयांचा पहिलं पारितोषिक असलेल्या या स्पर्धेत गोवा व महाराष्ट्रातील 32 संघ सहभागी झाले असून ही संपूर्ण स्पर्धा कोकणसाद LIVE च्या युट्यूब चॅनलवर थेट LIVE करण्यात आली आहे. या स्पर्धेचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या हस्ते दीप्रज्वलन व मैदानावर फित कापून करणेत आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. वंदना सावंत, कोकणसाद LIVE चे ब्युरो चीफ संदीप देसाई, पर्ये येथील सामाजिक कर्यकर्त अंकुश मांद्रेकर, अशोक दळवी, पोलीस पाटील पांडुरंग सावंत, शिवसेना कार्यकर्ते दशरथ फटी गवस, फटी गवस, योगेश गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी बाबुराव धुरी यांनी आपण तळेखोल गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून आपले नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. तेथील क्रीडांगण जागेच महत्व सांगताना ते म्हणाले हे आपल्या गावचे वैभव आहे. ही शासकीय जागा कुणा उद्योजकाच्या ताब्यात जाणार नाही यासाठी ती ग्रामपंचायत ताब्यात घ्या. आणि आपल्या गावात तालुक्यातील एक सुंदर क्रीडांगण निर्माण करा, शिवसेना आपल्याला सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. तर सरपंच सौ. सावंत यांनी आपल्या गावात गवस ब्रदर्स स्पोर्ट क्लब ने या स्पर्धेचे सुंदर आयोजन करून आपल्या गावातील व परिसरातील खेळाडू साठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केलं.
ग्रामीण भागातील संघाना अद्यापही संधी...
या स्पर्धेत तिसरा व चौथा दिवस हा नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रातील खेळाडू संघासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागातील संघाना या मोठ्या स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास व अधिक माहितीसाठी योगेश गवस 7722042267 व राजू गवस 8468952180 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गवस ब्रदर्स क्लब तर्फे करण्यात आले आहे.
भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना उ.बा.ठा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सोबत सरपंच सौ. वंदना सावंत, पत्रकार संदीप देसाई, दशरथ मांद्रेकर, अशोक दळवी, दशरथ फटी गवस व अन्य.