
सावंतवाडी : येथील मिलाग्रीस प्रशालेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अवनी मेघश्याम भांगले हिने २७ जून ते २९ जून २०२५ या कालावधीत गोवा येथे आयोजित सातव्या शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत दहा मीटर पिस्टॉल या क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे.
या शूटिंग स्पर्धेमध्ये अवनी हिने अव्वल स्थान प्राप्त केले. तिने वैयक्तिक चॅम्पियनशिप युथ वुमन तसेच चॅम्पियनशिप सब युथ वुमन या गटातून विजय संपादन करीत या दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
तिच्या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदान्हा यांनी तसेच श्रीमती संध्या मुणगेकर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी या सर्वांनी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिला उपरकर शूटिंग रेंजचे प्रशिक्षक कांचन उपरकर, प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो, हितेश मालणकर यांचे मार्गदर्शन लाभले.