कणकवली : कणकवली मध्ये होत असलेल्या ARM म्हणजेच अभय राणे मित्र मंडळ आयोजित कबड्डी लीग स्पर्धेचा महासंग्राम दिनांक 19 ,20 ,21 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी उद्या बोली लागणार आहे.
या कबड्डी स्पर्धेसाठी लागणारे मैदान देखील चांगल्या दर्जाची व्हावे यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.त्याची तयारी देखील जयत सुरू आहे. या स्पर्धेचे हे चौथ वर्ष असून जिल्ह्यातून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. पुरुष गटासाठी कणकवली तालुकास्तरीय लीग तर महिला गटांसाठी 65 किलो वजनी गटामध्ये जिल्हा स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.
गेल्या ३ वर्ष अभय राणे मित्र मंडळाच्या वतीने ही कबड्डी लीग स्पर्धा भरवण्यात येते याच कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून कणकवलीतील नवीन खेळाडू घडतात व जिल्ह्याचे नेतृत्व करतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी खालील नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे आणि उपाध्यक्ष सर्वेश राणे यांनी केले आहे.
महिलांसाठी अमिता राणे 9975853532
पुरुष गटासाठी
यश पालव 9403070166
सागर राणे 7841878406