सावंतवाडी : भालावल गावचा सुपुत्र असलेला मुंबईस्थित यश भरत परब याने आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात सिल्वर पदक पटकावले. तसेच या स्पर्धेच्या विविध प्रकारात यश परब याने एक गोल्ड मेडल आणि एक सिल्वर मेडल पटकावताना स्कॉट नावाच्या खेळामध्ये २५६ किलो वजन उचलून नवा आशियाई रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
उझबेकिस्थान येथे २ ते ८ डिसेंबर दरम्यान झालेल्या झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशने पावर लिफ्टिंग या क्रिडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी बजावल्याबद्दल यशचे भालावलवासियांसह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.