आगामी काळात महिला पत्रकारांनीही क्रिकेट स्पर्धेत उतरावे : अर्चना घारे

Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2024 05:55 AM
views 69  views

सावंतवाडी : सावंतवाडीत पत्रकार बांधवांच्या  क्रिकेट स्पर्धा  मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. यात पुरुष मंडळी यांचा सहभाग आहे. मात्र, आगामी काळात महिला पत्रकार भगिनींचा देखील सहभाग घ्यावा, असे आवाहन अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे - परब यांनी येथे केले.


सावंतवाडी तालुका पत्रकार संघ (संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ) यांच्या वतीने रविवारी जिल्हास्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धा - २०२४ सावंतवाडी येथे जिमखाना मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या निमित्ताने पत्रकार खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे - परब, भोंसले नॉलेज सिटीचे शिल्पकार अच्युत सावंत - भोंसले  यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.


प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सावंतवाडी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, राजेश मोंडकर, दीपक गांवकर, विजय राऊत, हर्षवर्धन धारणकर, लुमा जाधव, सचिन रेडकर, व पत्रकार संघाच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, सिताराम गावडे, राजू तावडे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, श्री दत्तगुरु बिल्डर्स व डेव्हलपर्सचे पार्टनर श्री. कामत, युवा उद्योजक विराग मडकईकर, मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष जावेद शेख, पत्रकार विजय देसाई, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, तालुका पत्रकार संघाचे सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, आदी उपस्थित होते.


यावेळी उपस्थित बीकेसीचे शिल्पकार अच्युत सावंत- भोंसले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, निरामय आयुष्यासाठी मैदानावर खेळणे ही अत्यंत काळाची गरज असून पत्रकार बांधवांनी आपल्या स्वतःला वेळ देऊन अशा स्पर्धा नेहमी आयोजित कराव्यात, त्यासाठी आपण नक्कीच हवे ते सहकार्य करू असेही श्री. भोंसले यांनी आश्वासित केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका पत्रकार संघ  नेहमीच आदर्शवत असे  उपक्रम राबवित असून राज्याला अभिमान वाटावा, असे विधायक कार्य सावंतवाडी तालुका पत्रकार संघ करीत आहे.

उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीण मांजरेकर यांनी केले.कार्यक्रमांस उपाध्यक्ष दीपक गावकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, सचिन रेडकर, हेमंत मराठे, लुमा जाधव, जतीन भिसे, प्रा. रुपेश पाटील, विजय राऊत, काका भिसे, जय भोसले, हर्षवर्धन धारणकर, संतोष परब, राजेश नाईक, शैलेश  मयेकर, निखिल माळकर, संजय पिळणकर व अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.


दरम्यान, रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांची सुकन्या रुची राऊत यांनीही दुपारी भेट देऊन पत्रकार खेळाडू बांधवांचे मनोबल वाढविले. यावेळी त्यांच्यासमवेत उबाठा सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले.