वैभववाडी : कै.आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्यावतीने कनिष्ठ महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या शहीद मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृह सकाळी १०वा.सूरु होणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन मुले व मुली अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रु. ३०००/-, रु. २०००/- व रु.१०००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.या स्पर्धेत सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाची व्यवस्थापन समिती, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी व जिमखाना विभाग प्रमुख प्रा.एस.बी.पाटील यांनी केले आहे.