मुक्ताई ॲकेडमीच्या स्पर्धा, इतर उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य! कोलगाव सरपंच संतोष राऊळ

कोलगाव येथे जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 17, 2023 12:39 PM
views 282  views

सावंतवाडी : श्री ईस्वटी कला - क्रीडा मंडळ, कोलगाव भोमवाडी आणि मुक्ताई अकॅडेमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोलगाव माध्यमिक विद्यालय येथे आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्तमरीत्या पार पडली. प्रारंभी कोलगावचे सरपंच संतोष राऊळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुक्ताई  अकॅडेमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, उद्योजक प्रवीण सावंत, कोलगाव विकास सोसायटीचे संचालक लक्ष्मण राऊळ, माजी सैनिक किरण सावंत, शिक्षक अरविंद मेस्त्री, सर्कल जगन्नाथ साईल, मुख्याध्यापिका ढोके मॅडम, अंगणवाडी सेविका पूर्वा सावंत, तृप्ती साईल, साक्षी धोंड, मंडळाचे कार्यकर्ते किसन राऊळ, महेश सावंत, अक्षय साईल, मंगलदीप पवार, आनंद कासार, राजा सावंत आदि उपस्थित होते.

जिल्हाभरातील नव्वद स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. प्रामुख्याने पाच वर्षाच्या मुलापासून ज्येष्ठ स्पर्धकांचा स्पर्धेत सहभाग होता. आठ आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धकांनी स्पर्धेत उपस्थिती दर्शविली.

यावेळी विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्या कोचिंग कँपमध्ये कोकणातून निवड झालेला सावंतवाडीचा एकमेव राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर, कोलगावचा आठ वर्षीय राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू यश प्रवीण सावंत, या वर्षीच्या शालेय कॅरम स्पर्धेत सातत्याने प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली सावंतवाडीची एकमेव खेळाडू साक्षी रमेश रामदुरकर आणि पन्नास टक्के दृष्टिदोष असलेला मालवणचा मयुुरेेश परुळेकर या अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांचा मंडळातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

सरपंच संतोष राऊळ यांनी मुक्ताई  अकॅडेमीच्या उपक्रमांचे कौतुक करतानाच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच यापुढे मोठी स्पर्धा घेणार असल्याचे जाहीर केले.  अकॅडेमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी कोलगावमधील विद्यार्थ्यांसाठी पुढील कालावधीत उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन पूर्वा सावंत यांनी केले.


स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -

खुला गट - प्रथम - संदेश गवंडी, (देवगड), द्वितीय - सुश्रुत नानल (कणकवली), तृतीय - बाळकृष्ण पेडणेकर, (सावंतवाडी), चतुर्थ मिहीर सकपाळ (देवगड), पाचवा अभिषेक सांगळे (देवगड).

विशेष दिव्यांग पारितोषिक - प्रथम मयुुरेेश परुळेकर (मालवण), द्वितीय राजाराम पाताडे (सुकळवाड)


१५ वर्षे मुले - प्रथम - सोहम देशमुख (सावंतवाडी), द्वितीय अनुज व्हनमाने (कुडाळ), तृतीय आर्यन सामंत (भोगवे).


१५ वर्षे मुली - प्रथम - साक्षी रामदुरकर (सावंतवाडी,) द्वितीय - भूमी कामत (सावंतवाडी), तृतीय - सौम्या हरमलकर (सावंतवाडी)

१० वर्षे मुले - प्रथम यश सावंत (कोलगाव),  द्वितीय - गौरांग टोपले (सावंतवाडी), तृतीय - अवनिश वेंगुर्लेकर (कोलगाव)

१०  वर्षे मुली - प्रथम - गार्गी सावंत (कोलगाव), द्वितीय - निधी गवस (सावंतवाडी), तृतीय - पलक पाटणकर (सावंतवाडी)