कौतुकास्पद | सावंतवाडीच्या निखिल नाईकची रणजी सामन्यासाठी निवड

Edited by: विनायक गावस
Published on: January 05, 2024 17:30 PM
views 1893  views

सावंतवाडी : देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील मानाच्या समजल्या जात असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं आपला संघ जाहीर केला आहे. महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधवकडे सोपवण्यात आले असून सावंतवाडीचा सुपुत्र निखिल नाईक याची रणजी सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. 

पहिला सामना सोलापुरमध्ये मणिपूर संघाविरुद्ध आजपासून ८ जानेवारी दरम्यान होत आहे. दुसरा सामना झारखंड संघाविरुद्ध १२ ते १५ जानेवारी या कालावधीत होत आहे. तिसरा सामना राजस्थानशी १९ ते २२ दरम्यान जोधपूरला, चौथा सामना हरियानाशी २६ ते २९ दरम्यान, पाचवा सामना विदर्भ संघाशी २ ते ५ फ्रेबुवारी या कालावधीत तर सहावा सामना सेनादलशी १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे होणार आहे.

सावंतवाडीचा निखिल नाईकची निवड

यामध्ये सावंतवाडीचा सुपुत्र निखिल नाईक याची रणजी सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. निखिल हा यापूर्वी आयपीएलमध्ये खेळला होता. कोलकात्ता नाईट रायडर्समधून त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आता रणजी सामन्यात तो आपली चमक दाखवणार आहे.

महाराष्ट्राचा रणजी संघ

केदार जाधव (कर्णधार), नौशाद शेख, सिद्धेश वीर, अंकित बावणे, निखिल नाईक, अझिम काझी, अक्षय पालकर, ओंकार खाटपे, रामकृष्ण घोष, प्रशांत सोळंकी, हितेश वाळुंज, प्रदिप दाढे, ओम भोसले, विकी ओस्तवाल, धनराज शिंदे, विशांत मोरे.