सावंतवाडी होणार भव्य मॅरेथॉन स्पर्धा

Edited by: विनायक गांवस
Published on: January 05, 2026 13:26 PM
views 36  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली, पी.  एफ. डॉन्टस फाऊंडेशन आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली या सैनिक शाळेच्या स्थापनेस २२ वर्षे पूर्ण झाली. २२ व्या वर्धापनदिनानिमित्त ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

दिनांक ११/०१/२०२६ रोजी सकाळी ०७ .०० वाजता जनरल जगन्नाथ राव भोसले उद्यान येथे मॅरेथॉन स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. सर्व स्पर्धकांनी सकाळी ०६.०० वाजता स्पर्धेच्या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी उपस्थित रहावे असे आवाहन केलं आहे. मॅरेथॉन स्पर्धा खुला गट( पुरुष/महिला),१० वर्षाखालील (मुले/मुली)१४ वर्षाखालील (मुले/मुली)१७ वर्षाखालील (मुले) अशा  गटांत होणार आहे.वरील  गटांतील विजेत्या मुले व मुली धावपटूंना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र तसेच अल्पोपहार देण्यात येणार आहे.

नोंदणी साठी ९४२०१९५५१८,९०२२७५८५२२, ९४२१२३८४८२ या क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा   https://forms.gle/Q9kcTkw7gop8odDeA लिंक द्वारे नोंदणी करावी. सदर स्पर्धेतील नोंदणी विनामूल्य आहे. स्पर्धेसाठी येताना आधार कार्ड घेऊन यावे.धावपटूंनी बहुसंख्येने मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले आहे.