पाचवी कनिष्ठ गट सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा 7, 8 जानेवारीस

कनिष्ठ गट राज्य मानांकन स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघाची होणार निवड
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 04, 2023 19:18 PM
views 263  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची ५ वी कनिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दि. ७ व ८ जानेवारी रोजी मुख्य प्रशासकीय इमारत, वेंगुर्ला नगरपरिषद येथे होणार आहे.

ही स्पर्धा १२, १४, १८  व  २१ वर्षांखालील मुले व मुली अशा ८ गटांमधे खेळविण्यात येईल. 

खेळाडू ३१ मार्च २०२३ तारखेपूर्वी प्रत्येक वयोगटानुसार पात्र असणे आवश्यक आहे. शनिवार दि . ७ रोजी १२ व १४ वर्षांखालील मुले व मुली आणि रविवार दि. ८ रोजी १८ व २१ वर्षांखालील मुले व मुली अशा वयोगटांच्या स्पर्धा होतील.

प्रवेश शुल्क रु. ५०/- व नोंदणी शुल्क रु. ५० असे एकूण रु. १००/- सह आपली नावे खालील ठिकाणी दि. ५ जानेवारी २०२३ संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत द्यावीत.

सावंतवाडी : राजेश निर्गुण ( ७५१७५३५०२८ )

कुडाळ : शुक्राचार्य म्हाडेश्वर ( ८८५५०६०८०६ )

कणकवली : पांडुरंग पाताडे ( ८६२५०७४१०६ )

देवगड : प्रकाश प्रभू ( ९४२३३०३८२२ )

स्पर्धा अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या प्रचलीत नियमावलीनुसार खेळविण्यात येतील.

खेळाडूंना पांढरा टी शर्ट व फूल पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट घालून सामने खेळणे बंधनकारक राहील.

या स्पर्धेमधून दि. ११ जानेवारी २०२३ रोजी दादर, मुंबई येथे खेळविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कॅरम असो.च्या ५६ व्या कनिष्ठ गट राज्य मानांकन स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघाची निवड खालीलप्रमाणे करण्यात येईल.

१२ व २१ वर्षांखालील मुले - २, मुली - २

१४ व १८ वर्षांखालील मुले - ६, मुली - ६. 

आंतरराष्ट्रीय कॅरम पंच आशिश बागकर व राष्ट्रीय कॅरम पंच अमेय पेडणेकर यांना स्पर्धेचे प्रमुख पंच नियुक्त केले आहे.

या स्पर्धेमधे जास्तीजास्त मुला मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन असो.चे अध्यक्ष अॅड. अवधूत भणगे व वेंगुर्ला कॅरम असो. चे अब्दुल शेख यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे सचीव योगेश फणसळकर ( ७६२०७५५७६६ ) यांच्याशी संपर्क करावा.