चिपळूण : शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील गोडबोले क्लासेसचे संस्थापक, संचालक अमेय गोडबोले यांना स्टार अॅवार्डस् २०२४ अॅण्ड एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्या संयुक्त कार्यक्रमांतर्गत 'बेस्ट क्लास इन रुरल रिजन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळणार गोडबोले क्लासेस हा कोकणातील पहिलाच क्लास ठरला आहे.
अमेय गोडबोले हे गोडबोले क्लासेसच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षांपासून विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत. ते क्लास व्यतिरिक्त सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी, पालक व इतर नागरिकांसाठी विविध शैक्षणिक व सामाजिक विषयावर मान्यवरांची व्याखाने, प्रशिक्षणे आयोजित करतात. त्यांच्या क्लासमध्ये सातवी ते बारावी माध्यमिक बोर्ड, सीबीएसई, इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी माध्यमातील मुलांना विशेष मार्गदर्शन केले जाते.
त्यांच्या क्लासने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे गोडबोले, हे इतर संस्थांमध्येही अध्यापन करतात. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कामामुळे यापूर्वी त्यांना 'ग्यानभूषण' व 'आयडॉल ऑफ महाराष्ट्र गुरुवंदना पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, पुणे येथील बेलगावे फाउंडेशन सांगली आणि ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे भारतीय समाजरत्न, सोशल एज्यूकेटर ऑफ द इअर हा राष्ट्रीय पुरस्कार, खेड येथील रिजनल टीचर ऑर्गनायझेशनतर्फे महाराष्ट्र आयडियल टीचर ऑफ द इअर हे राज्यस्तर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
आता गोडबोले यांना 'बेस्ट क्लास इन रुरल रिजन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे बीकेएस एमएमआरडीए मैदानात आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.