yoyohoneysingh | तरुणाईची धडकन हनी सिंग सध्या 'या' मॉडेलसोबत करतोय डेट

काहीच दिवसांपूर्वीच हनी सिंगचा झाला होता घटस्फोट
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 21, 2022 09:58 AM
views 276  views

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंगने काही दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चेमुळे चर्चेत आला होता. घटस्फोटानंतर तो एका अनोळखी महिलेसोबत दिसल्याने चाहते काहीसे आश्चर्यचकित झालेले. हनी सिंग त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही आहे. दरम्यान काहीच दिवसांपूर्वीच हनी सिंगचा घटस्फोट झाला होता आणि आता तो लगेचच या लोकप्रिय अभिनेत्रीला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी हनी सिंगने त्याच्या बेटर हाफसोबतचा एक फोटो शेअर केला होता.



यामध्ये संबंधित व्यक्तीचा चेहरा दिसत नसला तरी फोटो आणि कॅप्शनवरून ही हनी सिंगची गर्लफ्रेंड असल्याचा अंदाज बांधण्यात आला. दरम्यान अशी चर्चा सुरू झाली आहे की व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून मॉडेल आणि अभिनेत्री टीना थडानी आहे. सोशल मीडिया युजर्सनी असा तर्क केला आहे.


हनी सिंगची नवी गर्लफ्रेंड


मंगळवारी हनी सिंगने दोन हातांचा क्लोज-अप शॉट शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हे सर्व आपल्याबद्दल आहे, तुम्ही आणि मी!! माझे टुगेदर फॉरेव्हर गाणे आता रीलिज झाले आहे, तुमच्या जवळच्या व्यक्तींसह त्यावर रील्स बनवा.' त्याच्या या फोटोवरुन तो डेट करत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. बुधवारी 'सबरेडिट बॉली ब्लाइंड्स एन गॉसिप' वर एका पोस्टद्वारे असा दावा करण्यात आला आहे की हनी सिंग मॉडेल आणि अभिनेत्री टीना थडानीला डेट करत आहे.


टीनाला डेट करतोय असा अंदाज का बांधण्यात आला?


हनी सिंगने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये केवळ हात दिसत आहेत. ज्यातील महिलेच्या हातात जे ब्रेसलेट आहे तेच ब्रेसलेट टीनाच्या हातात अनेकदा दिसले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोतही हे ब्रेसलेट दिसले आहे. त्यांचा जुना एक फोटोही व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरील एकमेकांच्या पोस्टवरही हे कमेंट करत असल्याचे चाहत्यांच्या नजरेतून सुटलेले नाही.


शालिनीशी तुटले नाते


हनी सिंगने २०११ मध्ये शालिनी तलवारसोबत लग्न केले होते. शालिनीने हनीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता, यानंतर दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन खटल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांचा घटस्फोट निश्चित झाला. रिपोर्ट्सनुसार, हनीने शालिनीला लग्न १ कोटींची पोटगी दिली होती.