
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान, भारताची चिंता दोन गोष्टींनी वाढली आहे. पहली गोष्ट म्हणजे इराणमध्ये असलेले भारतीय नागरीकांची सुरक्षा आणि दुसरीकडे तेलाच्या किमतीत होणारी वाढ व त्याचा महागाईशी संबंध यामुळे युद्ध भारतासाठी फायदेशीर ठरणारे नाही. पाच मे रोजी क्रूड ऑईलची किंमत प्रती डाॅलर ५७ रुपये होती तेच दर आज १६ जून रोजी प्रती डाॅलर ७२ रुपयांवर पोहचले आहेत.
अशातच परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या लोकांना वाचवण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इराणमध्ये भारतीय विद्यार्थी आणि कामावर गेलेले लोक आणि त्यांचे कुटुंब यांचा समावेश आहे. आता या सर्वांना सुरक्षित ठिकाणी पाठवले जात आहे. तणाव वाढत असताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाने त्यावर काम सुरू केले. सध्या इराणमध्ये एकूण १० हजार भारतीय आहेत, ज्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढत आहे.
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे तेलाच्या किमती भडकत आहेत. इराण हा भारतासाठी सर्वात मोठा तेल पुरवठार देश आहे. या युद्धामुळे तेलाच्या कच्च्या किमतीत वाढ होत असून ही चिंताजनक बाब आहे. या किमती वाढल्या तर पेट्रोल डिझेलच्या किमतीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती पश्चिम आशियातील शांततेला बाधा ठरत आहे तर ही स्थिती आणखी संकटात टाकू शकते. तर दुसरीकडे कच्च्या तेलाची वाहतूकीला येणारी संभाव्य अडचण आणि तेलाचे वाढते भावही भारताला संकटात टाकू शकतात.
युद्धाच्या पार्श्वभुमीवर क्रुड ऑईलचे दर वाढत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या ब्रेंट क्रूड ऑईलचे दर ७५ डाॅलर प्रती बॅरल (पिपे) आहेत. वायदेबाजारात क्रूड ऑईलचे भाव ७३.९९ एवढे झाले आहेत. जर संघर्ष सुरुच राहीला तर कच्च्या तेलाच्या किमती १२० डाॅलर प्रती बॅरल होऊ शकतात.
तर दुसरीकडे तेलाचे भाव वाढते असतानाच तेलाची वाहतूक जहाजातून होते अशावेळी समुद्री मार्गे येणारे तेलाचा नियोजित मार्ग या जहाजांना बदलणे आर्थिक दृष्ट्या खर्चिक ठरणार आहे. त्यामुळे इंधन खर्च वाढेल, तेल पुरवठ्यास विलंब आणि किमती आणखी वाढतील. कच्चे तेलच वाढले तर पेट्रोल डिझेलचे दर वाढू शकतात. कारण हे दर कच्च्या तेलाच्या आयात खर्चावर अवलंबून आहे असे तज्ज्ञ सांगतात.
भारतात कच्चे तेल पश्चिम आशियामार्गे येते. होमुर्ज जलडरुममध्य हे या समस्याचे एक कारण आहे. हा जगात जाणारा प्रमुख तेलमार्ग आहे, या ठिकाणाहून जवळपास एक तृतीयांश तेल भारत समुद्र चेकपाईंटवरुन आणले जाते. या तणावादरम्यान हा मार्ग बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि ही शक्यता खरी ठरली तर भारताला क्रूड ऑईलच्या पुरवठ्यास अडचणी येऊ शकतात. आजतकने अर्थशास्त्रातील तज्ज्ञ आणि सुरक्षातज्ज्ञांचे मत सांगितले की, होमुर्ज जलडमरुमध्य मार्ग बंद होणे शक्य वाटत नाही.














