Eid-e-Milad-un-Nabi 2022 | 'ईद-ए-मिलाद' चा काय आहे इतिहास? जाणून घ्या !

इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला साजरा होतो हा सण
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 09, 2022 15:26 PM
views 460  views

ईद-ए-मिलाद म्हणजे ' अल्लाह 'चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ' ईद-ए-मिलादुन्नबी ' हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह.

ईद ए मिलाद उन नबी (Eid-e-Milad) हा इस्लाम धर्मीय लोकांसाठी खूप महत्वाचा सण आहे. इस्लामच्या दिनदर्शिकेचा तिसरा महिना मिलाद उन-नबी सुरू झाला असून या महिन्याच्या 12 तारखेला 571 ई. मध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता. तर पैगंबर हजरत मोहम्मद हे संपूर्ण जगात स्थायिक झालेल्या मुस्लिम लोकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहेत आणि या कारणामुळे इस्लाम धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्माचा दिवस खूप खास असतो. 

पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस संपूर्ण जगात आणि विशेष करून भारताच्या उपखंडामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो. तर या दिवसालाच ईद मिलाद उन नबी किंवा बरवाफत असे म्हणतात.


इतिहास काय आहे?


मक्का येथे जन्मलेल्या पैगंबर मोहम्मद यांचे पूर्ण नाव पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होते. अमिना बीबी अस त्याच्या आईचे नाव होते.तर वडिलांचे नाव अब्दुल्लाह होते. अल्लाहने सर्वात पहिल्यांदा पवित्र कुराण पैगंबर हजरत मोहम्मद यांना दिले. यानंतरच पैगंबरांनी पवित्र कुराणाचा संदेश सर्व लोकांपर्यंत नेला. हजरत मोहम्मद यांनी उपदेश दिला की मानवतेवर विश्वास ठेवणारा व्यक्ती महान आहे.


काय आहे महत्व?


ईद-ए-मिलाद-उन्-नबी म्हणून पैगंबर हजरत मुहम्मद यांचा जन्मदिवस किंवा जन्म उत्सव साजरा केला जातो. Eid Milad-un-Nabiच्या दिवशी रात्रभर प्रार्थना केली जाते आणि मिरवणुका काढल्या जातात. या दिवशी इस्लाम धर्माला मानणारे लोक हजरत मोहम्मद यांचे पवित्र वचने वाचतात. लोक मशिदी आणि घरांमध्ये पवित्र कुराण वाचतात आणि पैगंबर यांनी सांगितल्याप्रमाणे धार्मिकतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित होतात. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त घरे सुशोभित केली जातात, यासह मशिदींमध्ये विशेष सजावट केली जाते. यावेळी त्याचे संदेश वाचण्याबरोबरच गरिबांना दान करण्याची प्रथा आहे.  धर्मादाय किंवा जकात इस्लाममध्ये खूप महत्वाचे मानले जाते. असा विश्वास आहे की गरजू आणि गरीब लोकांना मदत केले तर अल्लाह प्रसन्न होतो.