अभूतपूर्व प्रतिसाद ! 'व्हॅरेनियम'च्या बेरोजगार मेळाव्यानं केला नवा विक्रम !

युवक युवतींनी उपक्रमाचं केलं जोरदार स्वागत ! एकाच दिवसांत 700 हुन अधिक बेरोजगारांचं भवितव्य उज्ज्वल
Edited by: भरत केसरकर
Published on: January 05, 2023 17:41 PM
views 338  views

सावंतवाडी : कोकणातल्या युवक युवतींना नोकरीसाठी मुंबई किंवा गोव्याला जावं लागतं. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा खंडीत करत सावंतवाडी इंथ बेरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. व्हरेनियम क्लाउड आणि सिक्योर क्रेडेंशियल या कंपन्यांच्या माध्यमातुन झालेल्या या उपक्रमाचं कोकणातल्या युवक युवतींनी जोरदार स्वागत केलंय. 


आजच मुलाखत आणि आजच नोकरी असं आश्वासन देत तब्बल 22 कंपन्यांचा हा बेरोजगार मेळावा, कोकणात एक नवा विक्रम घडवणारा ठरला तो युवक युवतींच्या अभुतपूर्व प्रतिसादामुळं. दुपारी तीन ही मेळाव्याची वेळ होती. मात्र त्यापूर्वीच बेरोजगार युवक युवतींची प्रचंड गर्दी स्टेडीयमच्या बाहेर जमा झाली. त्यामुळं नियोजित उदघाटन समारंभ रदद करून थेट मेळाव्यालाच प्रारंभ करण्याच अत्यंत चांगला निर्णंय आयोजकांनी घेतला. मेळाव्यात एअरटेल, अमित इलेक्ट्रिक वर्क्स, ऑटो क्राफ्ट, भगीरथ इंटरप्राइजेस, दीप प्लम्बिंग वर्क, युरेका फोर्ब्स, होम रिवाईज एज्युकेशन, हॉटेल नीलम कंट्रीसाईड, हॉटेल स्पाइस कोकण, हॉटेल अप्पर डेक, इनफ्रीपी आयटी सर्व्हिसेस, जैतापकर ऑटोमोबाईल, मार्कसन फार्मा, माया एचआर सोल्युशन, नेक्स्ट स्टॉप टेक्नोलॉजी, वन रिअलअर सिव्हिल, पेटीएम, क्वेस कॉर्पोरेशन, साई प्लम्बिंग वर्क, साई ट्रेडर्स, सिक्योर क्रेडेंशियल्स, टेरमेरिक लाईफ स्टाइल, व्हॅरेनियम क्लाउड, उन्मेष फॅब्रिकेशन, वृषाली ऑटो केअर या पुणे, गोवा, कोल्हापूर येथील प्रमुख कंपन्या तसेच स्थानिक कंपन्या सहभागी होत्या.


या उपक्रमामुळं आम्हाला अत्यंत चांगले उमेदवार मिळाल्याचं सांगत कुडाळ एमआयडीसीतल्या भागीरथी एंटरप्रायजेसच्या रेणुका कोचरे यांनी या उपक्रमाचं स्वागत केल. 


गरजु युवक युवतींपर्यंत अत्यंत चांगले जॉब पोहोचायला हवेत, यासाठी आम्ही हा मेळावा घेतला असुन जास्तीजास्त बेरोजगारांना यात नोक-या मिळतील, असा विश्वास 'व्हॅरेनियम' क्लाउड लिमिटेडचे नेटवर्क हेड मुकुंदन राघवन यांनी व्यक्त केला. 


कोकणातील बेरोजगार युवक युवतींना प्रथमच अशा प्रकारची संधी मिळत असल्यामुळं या मेळाव्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. अभूतपूर्व गर्दीमुळं अनेकांची निराशा झाली असेल परंतु निराश न होता त्यांनी पुन्हा प्रयत्न करावा, कारण काही दिवसातच आम्ही असाच मेळावा पुन्हा घेत आहोत, अशी माहिती, वरेन्यम क्लाउड लिमिटेडचे सावंतवाडी हेड विनायक जाधव यांनी दिली.

दरम्यान, कोकणातील बेरोजगार युवक आणि युवतींनीही या मेळाव्याचं जोरदार स्वागत केलं असुन असे उपक्रम अत्यंत आवश्यक असल्याचं कोकणसाद लाईव्हशी बोलताना सांगितलंय.