कुडाळ : ज्या शाळेने मला घडवलं त्या शाळेत आज माझा सत्कार होतोय, याचा मला आनंद आहे. ही शाळा महाराष्ट्रात नव्हे तर देशात नंबर वन बनावी, हि माझी प्रामाणिक इच्छा आहे. ह्या साठी येत्या वर्षभरात दुमजली शाळा बांधण्याचा माझा मानस असणार आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो, अद्ययावत इमारत मी बांधणारच आहे. संस्थेने, शाळेने अद्ययावत आराखडा करण्यासाठी आपणासह माजी विद्यार्थ्यांची एक बैठक आयोजित करावी, असे भावनिक आवाहन विशाल परब यांनी केले आहे. माणगाव येथील श्री वासुदेवानंद माणगाव सरस्वती विद्यालय माणगावच्यां स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावरून युवा उद्योजक, भाजप नेते तथा विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब बोलत होते.
विशाल परब म्हणाले, मी ज्या शाळेत घडलो त्या शाळेच्या व्यासपीठावर माझा सत्कार होत आहे. ह्या माझ्या यशात माझे गुरुजन ,माझे बालमित्र अनेक मित्र परिवार माझ कुटुंब यांचा खूप मोठा वाटा आहे. मी ह्या शाळेत शिकलो त्या शाळेतील खेळलेल विस्तूर्त मैदान, त्या वेळी मुज कॅन्टीन मधला वडापाव, भूक लागली तरी उपाशी पोटी घेतलेलं शिक्षण, शिक्षकांनी चूक झाल्यावर लगावलेली छडी, गुरूने दिलेले ज्ञानाचे धडे, याच्या आठवणी आजहि जश्याच्यातशा माझ्या स्मरणात आहे. त्यामुळे मला घडविलेल्या शाळेसाठी काहीतरी करून त्याची उतराई होऊन शाळेचे उपकार फेडण्याची हीच खरी योग्य वेळ आहे. त्यामुळे माझी शाळा मोठी होण्यासाठी मी झटणार आहे, असे भावनिक उद्गार विशाल परब यांनी काढले.
ह्यावेळी व्यासपीठावर विशाल परब व संस्था अध्यक्ष सगुण धुरी, सीईओ वि.न. आकेरकर, मुख्याध्यापक प्रशांत धोंड, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.