बांदा : बांदा ग्रामपंचायत निवडणुक हि सर्वांत प्रतिष्ठेची ठरली असून भाजप विरुद्ध बांदा शहर विकास पॅंनल अशी लढत होत आहे. सकाळपासून मतदारांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, एका बुथवर राजकारणा पलिकडचं चित्र पहायला मिळाल. निवडणुकीच्या फोटोसेशनसाठी भाजप व शहर विकास आघाडीच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते एकाच फ्रेमध्ये आले. यावेळी प्रभाग क्रमांक २ चे भाजपचे उमेदवार जावेद खतिब यांनी यावेळी आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला. तर शहर विकासचे उमेदवार राजेश विरनोडकर यांनी देखील आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला. याप्रसंगी इतरही उमेदवार उपस्थित होते.
राजकारण बाजूला ठेवून निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडण्यासाठी दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकत्र येत वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. ज्यावेळी प्रतिस्पर्धी एकाच फ्रेममध्ये आल्यानं चर्चा झाली तेव्हा एका कार्यकर्त्याने ''ह्या बांदा हा....!'' अशी प्रतिक्रिया दिली.
मतदार राजानं आपला कौल मतपेटीत कैद केला असून जय-पराजयाच गणित मंगळवारी स्पष्ट होईलच. परंतु, राजकारणात सक्का भाऊ पक्का वैरी होत असताना बांदावासीयांनी मात्र, समाजासमोर वेगळा आदर्श घालून दिला आहे. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उमेदवार जावेद खतिब, राजेश विरनोडकर यांच्यासह प्रतिस्पर्धी पॅंनलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.