नंबर 1 महाचॅनेलच्या 'मोस्ट व्हायरल बाप्पा' महाऑनलाईन स्पर्धेचे 'हे' आहेत विजेते !

स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार महाचॅनेलच्या 1 मार्चला होणाऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 01, 2022 21:35 PM
views 490  views
हायलाइट
दुसरा क्रमांक आनंद बाबाजी चव्हाण, आदर्शनगर, चौकुळ
तिसरा क्रमांक सुमीत सत्यवान नाईक, मळेवाड-जकातनाका, नाईकवाडी
सलग 9 व्या वर्षी, महाचॅनेलच्या पहिल्या 'मोस्ट व्हायरल बाप्पा' स्पर्धेला तुफान प्रतिसाद

सिंधुदुर्ग : कोकणातल्या वाडीवस्तीवरील बाप्पांचे दर्शन जगभरातील कोकणवासीयांना घेता यावे, यासाठी कोकणचं नंबर 1 चॅनेल कोकणसाद लाईव्हनं यावर्षी प्रथमच मोस्ट व्हायरल बाप्पा, ही ग्लोबल गणेश स्पर्धा घेतली होती. कोकणात प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या ग्लोबल स्पर्धेला पहिल्याच वर्षी अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल आज जाहिर करण्यात येतोय. त्यात मालवणमधल्या ओवळीये इथल्या घाडीगावकर परिवाराच्या बाप्पानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक महेंद्र बाबाजी चव्हाण, आदर्शनगर, चौकुळ, सावंतवाडी यांचा आला तर तिसरा क्रमांक सुमीत सत्यवान नाईक, मळेवाड-जकातनाका, नाईकवाडी, सावंतवाडी यांनी पटकावला आहे.



कोकणचं नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE च्यावतीने गणेश सजावट स्पर्धेचं आयोजन केलं होत. यंदा या स्पर्धेचं हे 9 वे वर्ष होतं. सलग 9 व्या वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेचं यंदाचं स्वरूप मात्र थोडं हटके होतं. याही हटके आयडियाला स्पर्धकांचा तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळाला. नंबर 1 महाचॅनेलच्या कोकणातील पहिल्या महाऑनलाईन 'मोस्ट व्हायरल बाप्पा' या स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळाला. कोकणातील ही पहिलीच ग्लोबल स्पर्धा ठरली. जगभरातून हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र यात बाजी मारलीय ती मालवणमधल्या ओवळीये इथल्या घाडीगावकर परिवाराच्या बाप्पानं. कोकणवासीयांच्या पसंतीस उतरलेला हा घाडीगावकर परिवाराचा बाप्पा मोस्ट व्हायरल ठरलाय. दुसरा क्रमांक महेंद्र बाबाजी चव्हाण, आदर्शनगर, चौकुळ, सावंतवाडी यांचा आलाय तर तिसरा क्रमांक सुमीत सत्यवान नाईक, मळेवाड-जकातनाका, नाईकवाडी, सावंतवाडी यांनी पटकावला आहे.


उत्तेजनार्थ दहा क्रमांकात अनुक्रमे अक्षय दीपक निवळे, कोलगाव-सावंतवाडी, अभिषेक घाडी, धवडकी, माडखोल सावंतवाडी, दुर्गानाथ शिरगावकर, बिबवणे, पळसेवाडी, कुडाळ, सिध्देश श्रीपादराव सुर्वे, खासकीलवाडा, सावंतवाडी, अभय अनिल कदम, सरंबळ, कुडाळ, संतोष अमृत परब, मातोंड,  वरचे बांबर, मिशाळ परिवार, जिल्हा परिषद शाळा नंबर, दोन, उभा बाजार सावंतवाडी, गजानन रत्नोबा कुडतरकर, रतांबेवाडी कणकवली, नवलराज विजयसिंह काळे, सडूरे, सोन धरणे तालुका वैभववाडी, किशोर बजरंग कुबल, तारकर्ली, मालवण असे विजेते आहेत.  

 

कोकणात अशी स्पर्धा प्रथमच होत असल्यामुळे आणि या स्पर्धेच्या माध्यमातुुुन वाडी वस्तीवरचे गणपती जगभरात पोहोचवण्याचे एक नवे व्यासपीठ निर्माण झाल्यामुळे या स्पर्धेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. सध्याच्या डिजिटल युगात जगभरातले अधिकाधिक कोकणवासिय एकमेकांशी वेगानं जोडले जाताहेत, याचबरोबर कोकणवासीयांचे सण आणि उत्सवही ग्लोबल पातळीवर अशा पध्दतीने मोठया प्रमाणात साजरे केले जाताहेत, याचीच प्रचिती या महाचॅनेलच्या मोस्ट व्हायरल बाप्पा स्पर्धेनं दिली. या स्पर्धेचं बक्षीस वितरण नंबर 1 महाचॅनेलच्या 1 मार्चला होणाऱ्या वर्धापनदिनी करण्यात येणार आहे. या विजेत्या स्पर्धकांचं टीम कोकणसाद LIVE कडुन अभिनंदन करण्यात आलंय.