फुकेरीच्या किल्ले हनुमंत गडावर उजळला छत्रपतींचा इतिहास !

छत्रपतींच्या स्मारकाचा जीर्णोद्धार व तोफगाडा लोकार्पण सोहळ्याने गडावर शिवशाहीचे दर्शन
Edited by: संदीप देसाई
Published on: December 26, 2022 10:55 AM
views 420  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शिवकालीन किल्ले हनुमंतगडावरील शिवस्मारकाचा जीर्णोद्धार व तोफगाडा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात व शिवप्रेमीच्या अमाप उत्सहात रविवारी २५ डिसेंबरला पद्मश्री परशुराम गंगावणे व माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सपन्न झाला. या सोहळ्यात माजी खासदार निलेश राणे यांनी तडखेबाज भाषण करत सह्याद्री प्रतिष्ठानने अलोकिक काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात किल्ले हनुमंत गडाला दिलेली नवी झळाळी खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आपण या गडकोट किल्ल्याच्या विकासासाठी एक अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करा त्यासाठी लागेल तितका निधी देण्याची जबाबदारी आमची असेल, आम्ही जे आमच्या हक्काचे असेल ते कुणाकडे मागत बसणार नाही तर ते कसं मिळावायचं हे रानेंना पक्कं माहित आहे, त्यासाठी आपण पुढे व्हा, आम्ही आपल्या सोबत आहोत असे अभिवचन सह्याद्री प्रतिष्ठान व फुकेरी ग्रामस्थांना दिले आहे.



 राणे नुसते बोलत नाहीत तर जे बोलतात ते करून दाखवतात, यासाठी निर्धास्त राहा आणि महाराजांच्या गड कोटंसाठी सुरु असलेलं आपलं कार्य असच सुरु ठेवा. हनुमंत गड ही ऐतिहासिक वास्तू जपणे आम्हां शिवभक्तांचे कर्तव्य आहे. गड संवर्धनासाठी सरकारने निधी दिला नसला तरी, राणे कुटुंबीय कुठल्याही प्रकारची मदत करण्यास सक्षम आहे. दिला शब्द पाळला नाही तर अशा व्यासपीठावर पुन्हा बोलावू नका, असे खुले आवाहन देत शिवभक्तांना मोठा दिलासा देण्याचे काम खासदार निलेश राणे यांनी केलंय. 

 


सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग, श्री देवी माऊली सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ, किल्ले हनुमंत गड फुकेरी यांच्यावतीने रविवारी किल्ले हनुमंत गडावरील शिवस्मारक जीर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळ्या निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवरथ यात्रा हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी तो प्रकाश झोतात आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रविवारी फुकेरी येथील हनुमंत गडावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जीर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत गोवा, कर्नाटक, बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सांगली आदी ठिकाणाहुन मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी उपस्थित होते. माजी खासदार निलेश राणे तसेच पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, जि. प. चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजू परब, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्रमिक गोजममुंडे, वैभव इनामदार यांसह फुकेरी ग्रामस्थ, सह्यादी प्रतिष्ठानचे दुर्गसेवक, शिवप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आडाळी येथील घुंगरकाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केले.  



 फुकेरीतील हनुमंत गडाच्या संवर्धनासाठी जमलेल्या शिवप्रेमींनमधील उत्साह बघून माझ्यात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. हनुमंत गड या ऐतिहासिक स्थळाचा व फुकेरी गावाचा पर्यटनात्मक विकास करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. गडावर येणाऱ्या प्रत्येकाने गडाचे पावित्र्य राखलेच पाहिजे. गडावर कोणी पर्यटक दारूची बाटली घेऊन दिसलाच तर त्याला बाटलीसहित फेकून देऊ महाराजांच्या पवित्र स्थळांवर अशांची गय केली जाणार नाही. कायदे नियम जसे राणेंना कळत नाहीत तसे शिवभक्तांनाही कळत नाहीत. मी शिवरायांचा भक्त असून जर कोणी सदैव शिवकार्यासाठी सदैव पुढे असू असे तडाकेबाज उदगार काढत त्यांनी शिव प्रेमिना बळ दिल. कार्यक्रमा दरम्यान अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष ऍड. सोनू गवस, सचिव उदय पास्ते, तसेच नाट्यकर्मी गणेश ठाकूर यांसह तालुक्यातील शेकडो शिवप्रेमीनी हनुमंत गडावर हजेरी लावली होती. विशेष म्हणजे दोडामार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ठाकूर व त्यांच्या टीमनेही हा सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी फुकेरीत उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य केलं.




 चार महिन्यात हनुमंत मंदिर उभारणार..

दरम्यान ज्या प्रामाणिक कार्याने ऐतिहासिक शिवकालीन किल्ले हनुमंत गडावरील शिवस्मारक जीर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळा मार्गी लावला, त्याच उमेदीने दुर्ग मावळे व सह्याद्री प्रतिष्ठान किल्ले हनुमंत गडावर पुढील चार महिन्यात श्री. हनुमान मंदिर उभारणी करेल, अशी भावना सह्याद्री प्रतिष्ठानचे संथापक श्रमिक गोजममुंडे यांनी व्यक्त केली.

 
जे राजकारण्यांना जमलं नाही ते शिवप्रेमीनी केलं

राजकीय, सामाजिक कारकिर्दीत गेल्या ४० वर्षांमध्ये या सारखा ऐतिहासिक कार्यक्रम मी अद्याप पाहिलेला नव्हता. फुकेरी हनुमंत गडावरील या ऐतिहासिक कार्यक्रमाचा मला साक्षीदार होता आलं हे माज मी भाग्य समजतो. या गडाच्या संवर्धनासाठ मला खारीचा वाटा उचलण्याची संधी मीळाली ते माझे भाग्य समजतो. जे आम्हाला आणि कुठल्याच राजकारण्याना जमलं नाही ते आपण करून दाखवलं. मात्र आता विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार कडून राज्यातील गड-किल्ले संवर्धनासाठी विशेष महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून व जिल्हा नियोजन समिती तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने हनुमंत गडासाठी भरघोस निधी मिळवून देण्याची ग्वाही राजन तेली यांनी दिली.