कुडाळची शान | माने जी क्रिएशनचे 'हॉटेल लाईम लाईट'

मल्टिकझिन रेस्टॉरंट, सुपर डिलक्स लॉजिंग आणि बॅक्वेट हॉल
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 02, 2023 19:59 PM
views 361  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा सध्या गोव्याच्या पर्यटनक्षत्राबरोबर स्पर्धा करू लागलाय. जिल्ह्यातील देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला येत असलेला सिंधुदुर्ग जिल्हा, त्यातील नयनरम्य नैसर्गिक रचना असलेले समुद्रकिनारे, मनमोहक पर्यटन क्षेत्रे पर्यटकांच्या मनाला भुरळ घालत आहेत.


याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्राचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कुडाळ शहराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. कुडाळ शहरातून जाणारा मुंबई गोवा महामार्ग तसेच अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचा थांबा असलेलं रेल्वे स्टेशन, मालवण, वेंगुर्ले सावंतवाडी, निवती, भोगवे यांसारख्या पर्यटन क्षेत्राकडे जाणारे मार्ग, गोव्यातील मोपा येथील विमानतळ, चीपी विमानतळ कडे जाणारे मार्ग कुडाळ मधूनच जातात. त्यामुळे कुडाळ आता विविध दृष्टीनी विकसित होत आहे .त्यामुळे सहाजिकच कुडाळ शहरात पर्यटकांची राहण्याची उत्तम सोय, उत्तम मालवणी पदार्थ बरोबरच विविध प्रकारच्या खाण्यापिण्याची शाही व्यवस्था, सर्व सुखसोईनीयुक्त अशा निवास व्यवस्था व्हावी या दृष्टीने प्रदीप माने दांपत्यानी कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी माने जी क्रिएशन नावाचे बिझनेस संकुल उभारून त्यामध्ये लाईम लाईट (मून लाईट ) नावाचे अत्याधुनिक सुखसोयीनीयुक्त असे फॅमिली रेस्टॉरंट सुरू केलेले आहे .


पार्किंगची प्रशस्त व्यवस्था असलेल्या मनोवेदक, मनमोहक आंतर रचना असलेल्या लाईम लाईट फॅमिली रेस्टॉरंट मध्ये प्रवेश केल्यावर अंतर्गत सजावटीने मन तृप्त होते. पर्यटकांच्या गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था असलेल्या या हॉटेलमधील पदार्थही तेवढे दर्जेदार आणि लज्जतदार आहेत. अनुभवी कुकच्या कलात्मक, रसपूर्ण आणि चविष्ट पाककृती म्हणजे पंजाबी डिशेस, चायनीज, तंदूर, कोल्हापुरी, मालवणी डिशेस ही खासियत असलेले, ओपन टेरेसी सोय असलेले आणि  शंभर सीटिंग रेस्टॉरंट कुडाळ शहराची धडकन जणू!!


..आणि हो !..कुडाळ शहरात प्रथमच सर्व प्रकारच्या शाही मंगल सोहळ्यासाठी सिटी हार्ट नावाचा बॅक्वेट हॉलही मुंबईच्या धरतीवर आपले आगळे वेगळेपण सांभाळून आहे.


एसी नॉन एसी अशा उत्तम रूम  / सूट असलेलं त्याचबरोबर १६ सुपर डीलक्स दर्जाच्या सोयीने युक्त असणाऱ्या रूम्स  / सूट .अशा विविध प्रकारच्या सुखसोईनियुक्त असलेले याच हॉटेलमधले लॉजिंग पर्यटकांना नक्कीच लुभावणारे ठरणार आहे.