ब्युरो न्यूज : मनसे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही बंधू भाच्याच्या साखरपुड्यानिमित्ताने एकत्र आले होते. शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. पण मधल्या काळात पुलाखालून खूप पाणी निघून केले आहे. राजकीय व्यासपीठावर एकमेंकांवर टोकाची टीका करणारे हे ठाकरे बंधू राज ठाकरे यांची बहिण जयवंती देशपांडे यांच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी दोन्ही बंधू एकत्र आले होते.