सावंतवाडी : सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध श्री गणेश फोटो स्टुडीओचे मालक सुनील कोरगांवकर यांच्या पुढाकारातून व त्यांच्या सुनबाई ज्योती सुरज कोरगांवकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गातील पहिली ''चॉकलेट फॅक्टरी'' सावंतवाडी तालुक्यात मळगाव येथे सुरु झाली आहे. श्री गणेश चोकोबाईट्स् चॉकलेट फॅक्टरीच्या माध्यमातून विविध प्रकारची चॉकलेट, पेस्ट्रीस, केक, आईस्क्रिम, तंदूर चहाची चव एकाच छताखाली चाखता येणार आहे. आकर्षक अशी चॉकलेट गिफ्ट, फेस्टिव्हल कलेक्शन, चॉकलेट बुके आदी विविध व्हरायटीस देखील या ठिकाणी उपलब्ध आहे.
श्री गणेश फोटो स्टुडीओच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली कलर मशीन आणल्यानंतर आता जिल्ह्यातील पहिली ''चॉकलेट फॅक्टरी'' सावंतवाडी तालुक्यात उभारली आहे. मळगाव येथे हि फॅक्टरी सुरु झाली आहे. गणेश फोटो स्टुडीओचे मालक सुनील कोरगांवकर यांच्या सुनबाई ज्योती सुरज कोरगांवकर यांच्या संकल्पनेतून हि ''चॉकलेट फॅक्टरी'' दक्षिण कोकणचं प्रती पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊली मंदिर मार्गावर कुंभार्ली-मळगाव,मुंबई-गोवा हायवे लगत सुरु झाली आहे. या 'चॉकलेट फॅक्टरी'मुळे परिसरातील महिलांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून एयर एंड व नववर्षांची गोड सुरुवात झालीय. मळगाव, सोनुर्ली, वेत्ये आदि ग्रामिण भागातील जवळपास 20 हून अधिक महिला या ठिकाणी कार्यरत आहेत. श्री देवी सोनुर्ली माऊली मंदिर मार्गावर सुरु झालेल्या ''चॉकलेट फॅक्टरी''च्या माध्यमातून उपलब्ध झालेली रोजगाराची संधी हा देवी माऊलीचा आशीर्वाद असल्याची भावना येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलीय.
या ठिकाणी मिक्स ड्रायफ्रुट्स, प्लेन चॉकलेट, ड्रायफुट कोटिंग चॉकलेट, कस्टमाईज चॉकलेट, फिलिंग चॉकलेट, फेस्टिव्हल कलेक्शन, किड्स कलेक्शन, स्पेशल चॉकलेट बुकेसह विविध प्रकारची चविष्ट चॉकलेट उपलब्ध आहेत. तर केक व पेस्ट्रीसमध्ये आईस केक, पेस्ट्रीस केक,रोल केक, जार केक, फ्लेवर्ड केक, चॉकलेट केक आदि उपलब्ध असून ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळणार आहेत. याचबरोबर काजू, बदाम, खजूर
कोकम, लेमन, मॅगो सरबतसह ''कोकणी मेवा'' देखील याठिकाणी उपलब्ध आहे. श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक, ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊससह ''विन तंदूर चहाची'' डिफरंट व युनिक टेस्ट चाखता येणार असून मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या पर्यटकांच श्री गणेश चोकोबाईट्स् तोंड गोड करणार आहे अशा भावना ज्योती कोरगांवकर यांनी व्यक्त केल्या.
लग्नाआधीपासून चॉकलेट बनविण हा एक छंद म्हणून जोपासला होता. लग्नानंतर श्री गणेश फोटो स्टुडीओ व डिजिटल लॅबच्या व्यवसायात कार्यरत होते. परंतु, जोपासलेला छंद स्वत बसू देत नव्हता. त्यात सासरे, सासू, पती सासर व माहेरच्या मंडळींकडून स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी प्रेरणा व बळ मिळाल. त्यामुळे पूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतर आज स्वप्न साक्षात उभारलय. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमधून परिसरातील महिलांच्या हाताला काम मिळून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. माझासह इतर महिला आज स्वावलंबी होणार आहेत याचा विशेष आनंद होत आहे.
येत्या रविवारी 25 डिसेंबर रोजी भाजप जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राजन तेली यांच्याहस्ते या फर्मच उद्घाटन होणार असून यावेळी चॉकलेट फॅक्टरीला भेट द्या अन चविष्ट चॉकलेटची चव चाखा अस आवाहन श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरीच्या माध्यमातून सुनील कोरगांवकर,स्मिता कोरगांवकर,सुरज कोरगांवकर, ज्योती कोरगांवकर यांनी केल आहे.