सावंतवाडीची वाटचाल राजकीय दहशतीकडे ?

Edited by: विनायक गांवस
Published on: October 06, 2024 12:40 PM
views 92  views

सावंतवाडी : विचारवंतांची मोठी  पार्श्वभूमीवर असणाऱ्या सावंतवाडीला इतिहास, कला संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. शांत आणि संयमी पण तेवढंच मुरब्बी राजकारण या भुमीन आजवर अनुभवलेल आहे. मात्र, आता सावंतवाडीची वाटचाल ही राजकीय दहशतीकडे जात असल्याची भिती सावंतवाडीकरांना वाटू लागली आहे. त्याच कारण ठरलंय ते भाजपचे युवा नेते विशाल परब यांना दिलेल पोलिस संरक्षण. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अचानक दिलेल्या या प्रोटेक्शनमुळे त्यांचा जीवांला धोका नक्की धोका कुणाकडून ?  व का ? अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

नुकताच बांधकाम विभागात टेंडर मॅनेजसाठी राजकीय नेत्यांनी नेलेल्या बाऊन्सरना शिवसैनिकांनी मारलं. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सावंतवाडीतील हे टेंडर मॅनेज करण्यासाठी भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते असा गंभीर आरोप केला. सावंतवाडीच्या टेंडरसाठी बाऊन्सर संस्कृतीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना आता भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे संरक्षण दिल्याने विशाल परब यांच्या जीवाला नक्की कुणापासून धोका आहे ? तो का आहे ? हा धोका परकीयांकडून की स्वकीयांकडून आहे ?अशा अनेक चर्चां सुरू आहेत. युवा उद्योजक व कोणतही संविधानिक पद नसताना विशाल परबांच्या जीवावर कोण उठलय ? हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय. 

सावंतवाडी मतदारसंघात राणी पार्वती देवी भोसले, शिवराम राजे ते विद्यमान आमदार मंत्री दीपक केसरकर असे अनेक उच्चविद्याविभूषित, शांत व‌ संयमी आमदार लोकप्रतिनीधी म्हणून इथे राहीलेत. महात्मा गांधी यांनी सावंतवाडीला रामराज्य असे संबोधले होते. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इथले राजे बापुसाहेबांना 'राजनितीज्ञ राजा' म्हणून गौरविले होते‌. समाजवादी, कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या विचारांना या मतदारसंघात आजवर स्वीकारल आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात मागील दोन आठवड्यात सातत्याने घडणाऱ्या घटना व राजकारण बघता शांत व संस्कृत मतदारसंघाची वाटचाल ही राजकीय दहशतीकडे तर जाणार नाही ना ? अशी भिती व्यक्त होत आहे.