संदीप एकनाथ गावडे भाजपाचे माजी आंबोली मंडल अध्यक्ष, समाजसेवक, उद्योजक तथा माजी पंचायत समिती सदस्य. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा हा विश्वासू कार्यकर्ता. फणसवडे सारख्या अतिदुर्गम भागात जन्मलेल्या या युवकाचा मुंबईपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. भाजपचा निष्ठावंत असलेल्या या युवा नेत्यानं समाजसेवेचा वसा कायम ठेवलाय. उद्योग, व्यवसाय करताना समाजसेवा आणि दानशूरपणाचा हात त्यांनी कायमच पुढे ठेवला. त्यामुळेच सह्याद्री पट्ट्यात संदीप गावडे हे नाव आदरानं घेतलं जातं. संपर्कात असणारा, ओळख ठेवणारा आपला 'हक्काचा माणूस' म्हणून त्यांनी जनमानसाच्या हृदयात स्थान निर्माण केलय.
२९ जुलै १९८६ ला फणसवडे येथे त्यांचा जन्म झाला. एमबीएपर्यंत शिक्षण घेत त्यांनी फणसवडे ते मुंबई पर्यंतचा केलेला प्रवास हा थक्क करणारा आहे. त्यांच्या या प्रवासात मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सदैव आशीर्वाद लाभले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेली जबाबदारी त्यांनी विश्वासाने पार पाडली. प्रत्येक काम तडीस नेतात सावंतवाडी तालुका पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि ते पंचायत समिती सदस्य झाले. तळागाळात जाऊन समाजसेवा केली. तरुणांना रोजगार मिळावा, तरुण विविध क्षेत्रात पुढे यावे यासाठी प्रोत्साहन देत त्यांनी सदैव यशस्वी पावले टाकली. भाजपाचे आंबोली मंडल अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. याचाच प्रत्यय म्हणजे आंबोली मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायतीत भाजपचा झेंडा डोलानं फडकला.
सह्याद्री पट्ट्यातील दुर्गम गावात जात विकासासाठी आघाडीवर राहिले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विकासगंगा त्यांनी गावागावात पोहचवली. रविंद्र चव्हाण यांच्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो हे ते अभिमानाने सांगतात. कोरोना काळात सर्वत्र हाहाकार उडाला होता. या काळात देवदूता सारखे संदीप गावडे सह्याद्रीच्या पट्ट्यात जाऊन सेवा सुविधा गावांमध्ये केल्या. लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली. याशिवाय त्यांनी शालेय गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश वाटप करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला. गेली सहा वर्ष ते हा उपक्रम राबवित आहेत. आरोग्यसेवा ,रक्तदान असे करताना नवनवीन युवा कार्यकर्ते घडवीले. राजकारणापेक्षा समाजकारणात त्यांना अधिक आवड निर्माण केली.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर भाजपने सह्याद्री पट्ट्यातील ग्रामपंचायतची जबाबदारी दिली होती. त्यात त्यांनी शंभर टक्के यश मिळवत आंबोली मंडळ अध्यक्ष पदाला न्याय दिला. या पदाचा पुरेपूर उपयोग करून भाजपा संघटना वाढवण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला. सावंतवाडी पंचायत समिती सदस्य, भाजपा मंडळ अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर त्यांनी गोरगरीब जनतेच्या किंवा विकासकामाच्या बाबत प्रश्न ठेवल्यानंतर तो जलद गतीने मार्गी लागतो त्यामुळे ते या समाजसेवेच्या कामांमध्ये आघाडीवर राहू शकले अशी त्यांची भावना आहे. भाजप आणि भाजप या मताचेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत त्यामुळे संदीप गावडे देखील भाजप आणि भाजपच या तत्त्वानेच आपल्या नेत्याचा झेंडा आपल्या नेत्याचा नावलौकिक व्हावा म्हणून तळागाळातील लोकांना एकत्रित करून जनसेवेचे व्रत हाती घेऊन कार्यरत आहेत.
आंबोली व गेळे येथील कबुलायतदार गांवकर जमीन वाटप प्रश्नावर शासनाने निर्णय घेतला या निर्णयाचे खरे शिलेदार संदीप गावडे आहेत. त्यांनी एक पत्र सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सादर केले आणि तेच पत्र या निर्णयाला कारणीभूत ठरले. त्यांच्या प्रयत्नांमुळे पारपोली-देवसू-दानोली रस्त्याला डांबरीकरणासाठी नव्याने वाढीव ३० लाख रुपये मंजूर झाले. तर वाढीव रू. ३० लाख रुपये निधी पारपोली-देवसू-दानोली रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजूर झालेला आहे.
सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकामच्या बजेटमधून या निधीची तरतूद झाली आहे. मागील मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्याला ५० लाख रुपये मंजूर केले होते. मंजूर कामामध्ये देवसू नागझरी येथील चढावापासून खराब संपूर्ण रस्ता तसेच देवसु चर्च परिसरात खराब झालेला रस्ता धरून एस्टिमेट बनवण्यात आले होते.
पारपोली गावातील राहिलेल्या खराब रस्ते डांबरीकरण करण्याच्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता होती. या गरज ओळखून आज रू.३० लाख हे फक्त पारपोली मधील खराब झालेली लांबी दुरुस्त करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या समाप्तीनंतर दसरा किवा दिवाळीपासून नव्याने वाढीव मंजूर केलेले रू.३० लाख व मागील मंजूर झालेले.
रू.५० लाख (ज्याचे याधी टेंडर झाले आहे) अशा एकूण रू.८० लाखांच्या कामाची सुरुवात लवकर होणार आहे. नकारात्मक कृतीला सकारात्मक कामातून दिलेले हे उत्तर आहे. सध्या चालू असलेलं खड्डे भरण्याचे काम ह्याचा मंजूर कामांशी म्हणजे रू.३० लाख किंवारु.५० लाख च्या निधीशी कोणताही संबंध नाही.
चौकुळ गोनसाठवाडी येथे कॉजवे नाही तर नवीन पुल मंजूर केलाय. नवीन पूलासाठी रू.८० लाख मंजूर करण्यात आलेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी ग्रामस्थांच्यावतीन त्यांनी रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत. अशा या काम करणाऱ्या युवा नेत्याचा आज वाढदिवस. त्यांच्या भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी टीम कोकणसादकडून हार्दिक शुभेच्छा...!